केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व धनुष्यबाण पक्षचिन्ह यावर आज महत्त्वाचा निर्णय दिला. या निर्णयानुसार शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला मिळाले आहे. या निर्णयानंतर राजकीय नेते मंडळी आपली प्रतिक्रिया देत आहे.
निवडणूक आगोयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया;
मागील ६० वर्षांपासून शिवसेना व ठाकरे यांचे असलेले अतुट नाते संपुष्टात आले. यावरुन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत उद्धव ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. राज ठाकरे यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब यांच्या वक्तव्याची आठवण करून देत त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
शिवसेना व धनुष्यबाण मिळताच एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे म्हणतात की, नाव आणि पैसा, पैसा जातो, पुन्हा येतो. पण एकदा नाव गेलं की, परत येत नाही. ते येऊ शकत नाही, काळ्या बाजारत सुध्दा ते मिळत नाही. म्हणून नाव जपा, नाव मोठं करा.
“…म्हणून धनुष्यबाण हे शिवसेनेच चिन्ह”; तीस वर्षांपूर्वीचा ‘हा’ इतिहास
दरम्यान, एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा लोकशाहीचा विजय असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी ही लोकशाहीची हत्या असल्याचे, म्हटले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. तसेच यासंदर्भात जोरदार भाषणबाजीही सुरू झाली आहे.