राज ठाकरेंना आज कोर्टात हजर रहावे लागणार; अजामीनपात्र वॉरंट जारी!

Raj Thackeray to appear in court today; Non-bailable warrant issued!

सध्या ठाकरे कुटुंब विविध अडचणींचा सामना करत आहे. अशातच ठाकरे कुटुंबातील आणखी एका व्यक्तीसमोर नवीन संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray) यांना आज बीडच्या परळी कोर्टात हजर रहावे लागणार आहे. मध्यंतरी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर केलेल्या दगडफेकी प्रकरणी व चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान परळीच्या न्यायालयात ( Parali Court) तारखांना गैरहजर राहिल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ! एकनाथ खडसे नॉटरिचेबल

या प्रकरणी जामीन घेण्यासाठी राज ठाकरे आज न्यायालयात हजर राहणार आहेत. यासाठी राज ठाकरे हेलिकॉप्टरने आज सकाळी 10 वाजता पांगरी येथील गोपीनाथ गड येथे येणार आहेत. त्यानंतर परळी न्यायालयात हजर राहणार आहेत. दरम्यान मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन दुपारी 1:30 वाजता मुंबईला रवाना होणार आहेत. यापूर्वी 3 जानेवारी व 12 जानेवारीला राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते. परंतु, अचानक काही कारणांमुळे दौरा रद्द झाल्याने ते आज उपस्थित राहणार आहेत.

भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवड!

2008 मध्ये एका प्रकरणात राज ठाकरे यांना मुंबईमध्ये अटक करण्यात आली होती. यामुळे परळीमधील मनसे कार्यकर्त्यांनी धर्मापुरी पॉईंटवर दगडफेक केली होती. यानंतर राज ठाकरे व मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी चार्जशीट फाईल केल्यानंतर सुद्धा राज ठाकरे न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

बाळासाहेबांच्या तैलचित्र अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरेंना डावलले; आमंत्रण पत्रिकेत नावच नाही!

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *