Raj Thackeray: गणेश विसर्जनानंतर राज ठाकरेंचे राज्यभर दौरे; वाचा सविस्तर

Raj Thackeray tours across the state after Ganesh immersion; Read in detail

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) गणेश विसर्जनानंतर महाराष्ट्रभर दौरे घेणार आहेत. आताच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते सगळीकडे फिरणार आहेत. नाशिक दौऱ्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत कार्यकर्ते, पदाधिऱ्यांशी देखील संवाद साधला. त्यांनी अनेक मुद्यांवर फटकेबाजी केली. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिंदे-फडणवीस सरकार, प्रभाग रचना यासह अनेक मुद्द्यांवर त्यांनी प्रतिक्रिया दिल्या.

Supreme Court: दोषींची सुटका करण्याबाबत घेतलेल्या गुजरात सरकाराच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान

राज ठाकरेंवर मागच्या काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया पार पडली त्यांनतर ते पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमामध्ये बोलले. कार्यक्रमात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना ताकदीने निवडणुका लढवण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर अॅडजेस्टमेंट करून निवडणुका लढवू नका, असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. तुम्ही अॅडजेस्टमेंट केली तर या गोष्टी लपून राहत नाही. त्या कधी न कधी बाहेर येतात, त्यामुळे तुमची किंमत शून्य होईल असेही ते बोलले.

Atul Bhatkhalkar : मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? अतुल भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात भाषण केले .यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. राज्यातील सत्ताबदलावर त्यांनी थेट बोलणं टाळलं असलं तरी सरकारच्या काही निर्णयाचा त्यांनी त्यांच्या अंदाजात चांगलाच समाचार घेतलाय. महापालिका निवडणुकीवर मनसेने लक्ष केंद्रीत केले आहे हे देखील त्यांनी त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले आहे. राज ठाकरेंच्या भाषणाची आता राज्यभर चर्चा चालू आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *