Raj Thackeray । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सांगितले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचा पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला बिनशर्त पाठिंबा देईल. यासोबतच लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मनसे प्रमुखांनी सांगितले. गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या जाहीर सभेला ठाकरे बोलत होते. राज ठाकरे यांनी या घोषणेनंतर आज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे.
Sydney Terror Attack । सर्वात मोठी बातमी, प्रसिद्ध मॉलवर भीषण दहशतवादी हल्ला, लोकांचा आरडाओरडा
या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. यावेळी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय का घेतला? यासंदर्भातील कारण राज ठाकरे यांनी खुलासा केला आहे.
Eknath Shinde । राजकीय वर्तुळात येणार मोठा भूकंप? मुख्यमंत्र्यांचा अचानक कोल्हापूर दौरा
पाहा काय म्हणाले राज ठाकरे?
पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे म्हणाले, “नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत अनेक महत्वाचे विषय मार्गी लागले आहेत. त्यात राम मंदिराचा विषय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते तर राम मंदिर झालेच नसते, असे राज ठाकरे यांनी सांगितले. त्यामुळे पुढील पाच वर्ष त्यांना संधी मिळावी असे आपणाला आणि पक्षाला वाटले, यामुळे मनसेने महायुतीला पाठिंबा दिला असा खुलासा राज ठाकरे यांनी केला आहे.