राज ठाकरे यांच सर्वपक्षीय नेत्यांना पत्र, म्हणाले, “ज्यावेळी एखाद्या…”

Raj Thackeray's letter to all party leaders, said, "When someone..."

सध्या राजकीय वर्तुळात पिंपरी चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीच्या जोरदार चर्चा रंगल्या आहेत. काल भाजप आणि महाविकास आघाडीने उमेदवारांची नावे देखील जाहीर केली आहेत. आता याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज (५ फेब्रुवारी) सर्वपक्षीय नेत्यांना पत्र लिहून एक आवाहन केलं आहे.

मोठी बातमी! अभिनेत्री उर्वशी ढोलकियाच्या कारला भीषण अपघात

“ज्यावेळी एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीच निधन होत त्यावेळी तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी,” असं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

तुम्ही बंडखोरी करताना कोणाला सांगितलं? राम शिंदे यांचा अजित पवारांना सवाल

राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं निधन झाल्याने पोटनिडणुका होत आहेत. मी सुरुवातीपासून या मताचा आहे की, ज्यावेळी एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीच निधन होत त्यावेळी तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी.”

“…म्हणून सत्यजित तांबेंची चौकशी व्हावी”, काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याने केली मागणी

पाहा राज ठाकरेंनी काय म्हंटलय पत्रात –

महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांच नुकतंच दुखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कोल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एका उमद्या राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधींच्या घरातील नसेल तर जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही.

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी श्री. देवेंद्र फडणवीस ह्याना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केल होत. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणूका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा.

‘देवेंद्र फडणवीस मोठ्या भावासारखे’, सत्यजीत तांबेंच वक्तव्य चर्चेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *