अगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध पक्ष चांगलेच तयारीला लागले आहेत. दरम्यान, आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) ठाण्यातील टेंभी नाक्याजवळील जैन मंदिरात उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी आयोजित कार्यक्रमात ते विशेष अतिथी असणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते शहरात दोन ठिकाणी भेटी देणार असून शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठक देखील घेणार आहेत.
पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर! ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदाचं काय होणार?
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दुसरा ठाणे ( Thane) दौरा आहे. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे ठाण्यातील टेंभीनाका येथे कार्यालय आहे. येथूनच शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कामकाज चालते. यामुळे या परिसराला विशेष महत्त्व असून संपूर्ण जिल्ह्याचा राजकीय केंद्रबिंदु म्हणून या परिसराची ओळख आहे.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! धनुष्यबाण व शिवसेना कुणाची? सुनावणी संपली मात्र प्रश्न अजूनही अनुत्तरितच!
याभागात मोठया प्रमाणात जैन लोक राहतात. त्यांच्या मंदिराच्या कार्यक्रमासाठीच राज ठाकरे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या या दौऱ्याची तयारी सुरू केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या दौऱ्यादरम्यान राज ठाकरे काही खासगी भेटी सुद्धा घेणार आहेत. यानंतर ते ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत.
अजित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, “सरकारला सत्तेची मस्ती…”