
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांना मशिदींवरील भोंग्यांवरून इशारा दिला आहे. आज झालेल्या गुढीपाडवा सभेत राज ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17000 सैनिकांवर गुन्हे दाखल केले होते. मशिदींवरील भोंगे उतरवण्यात यावे यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान ही कारवाई करण्यात आली होती.
“सिंह घुसला थेट गावात अन् घडलं असं की…”, पाहा थरकाप उडवणारा Video
आता सरकार बदलले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना हे नाव देखील आले आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही चालतो, असे ते म्हणतात. म्हणून माझी त्यांना विनंती आहे की मागच्या सरकारने माझ्या 17000 सैनिकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. असे राज ठाकरे म्हणाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवावे. त्यांना ते जमत नसेल तर त्यांनी आमच्या कृतीकडे दुर्लक्ष करावे. मशिदीवरील भोंगे आम्ही उतरवू. असा सूचक इशारा राज ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारला दिला आहे.
राज ठाकरे यांनी शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर पहिल्यांदाच केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…
यावेळी त्यांनी प्रशासनाचे इतर गोष्टींकडे कसे दुर्लक्ष होत आहे? हे सांगताना माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याचे उदाहरण दिले. याठिकाणी दिवसाढवळ्या अनधिकृत बांधकाम सुरु असून देखील पोलीस व महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. हे बांधकाम लवकरात लवकर हटवले नाही तर याठिकाणी बाजूलाच गणेश मंदिर बांधणार असल्याची धमकी राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी यावेळी दिली.
गौतमी पाटील म्हणजे पावसाळ्यात उगवणारी छत्री; तमाशा परिषदेच्या अध्यक्षांनी केली जोरदार टीका