Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या रोखाने राज ठाकरेंचे जोरदार टीकास्त्र ; “माझ्याकडे विचार आहे, निशाणी असली काय, नसली काय.. फरक पडत नाही!”

Raj Thackeray's strong criticism of Uddhav Thackeray's money; "I have a thought, whether there is a mark or not.. it doesn't matter!"

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या आजच्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) रोखाने जोरदार टीकास्त्र सोडल्याचे दिसून येते. “माझ्या आजोबांचा, बाळासाहेब ठाकरेंचा विचार मला पुढे न्यायचा आहे. माझ्याकडे निशाणी असली काय, नसली काय.. नाव असलं काय, नसलं काय.. याने मला काही फरक पडत नाही. माझ्याकडे विचार आहे. सगळ्यात मौल्यवान गोष्ट कुठली असेल, तर ती म्हणजे ते विचार आहेत.बाकीचं सगळं सोडा, पण त्या बाबतीत मी श्रीमंत आहे. महाराष्ट्रात ज्या लोकांनी, महापुरुषांनी जे विचार पेरले, ते ऐकणं, वाचणं, त्यातून बोध घेणं, महाराष्ट्र समजून घेणं ही गोष्ट प्रत्येकानं करणं गरजेचं आहे” असे म्हणत राज ठाकरे यांनी शस्त्रक्रियेनंतर केलेल्या आजच्या पहिल्या भाषणात , उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

Sonali Phogat: “जेवणात गडबड होती…”, सोनालीचा तिच्या आईसोबतच्या शेवटच्या कॉलनंतर संशयाला वाव

२०१९ साली उद्धव ठाकरेंनी केलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या मागणीवर टीका करताना राज म्हणाले की,
“२०१९ला निवडणुका झाल्यानंतर शिवसेना-भाजपानं फारकत घेतली. का? तर म्हणे अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं होतं. मला अजूनही आठवतंय. मला माहिती आहे. कारण बाळासाहेब असताना झालेल्या त्या बैठकांमध्ये मी होतो. बाळासाहेब ठाकरे, मनोहर जोशी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असे बरेच जण होते. तिथे पहिल्यांदा ती गोष्ट ठरली की ज्याचे जास्त आमदार, त्याचा मुख्यमंत्री. जर ही गोष्ट तुमच्यात ठरली आहे, तर २०१९ला तुम्ही मुख्यमंत्रीपदाची मागणी करूच कशी शकता?”, असा यावेळी सवाल राज ठाकरेंनी केला.

Raj Thackeray: गणेश विसर्जनानंतर राज ठाकरेंचे राज्यभर दौरे; वाचा सविस्तर

राज्यात घडून गेलेला सत्तानाट्याखेरीस, शिवसेने समोर अनेक नवीन आव्हाने निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे गटाची बंडखोरी आणि त्यानंतर सत्तेत सामील होण्याच्या निर्णयामुळे मुळें, सत्तेची समीकरणं देखील मोठ्या प्रमाणावर बदलली आहेत. नेमकी खरी शिवसेना कोणती? शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावर कोणत्या गटाचा अधिकार असेल? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यासंदर्भात प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं असून येत्या २५ ऑगस्ट रोजी यासंदर्भात ५ सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर राज ठाकरें यांनी आज पक्ष पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात उद्धव ठाकरेंच्या रोखणे अप्रत्यक्षरीत्या टोलेबाजी केल्याचं बोलल्या जात आहे.

Atul Bhatkhalkar : मातोश्रीवर बसून शेळ्या कसल्या हाकता? अतुल भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका

कार्यकर्त्यांना उद्देशून राज म्हणाले की,

“माझी हात जोडून विनंती आहे, तडजोड करून निवडणुका लढवू नका. नुसते लाचार होऊन निवडणुका लढवू नका. शून्य किंमत राहील तुम्हाला!” माझे एवढे घे, तुझे एवढे घे वगैरे. यातून तुम्ही तुमची किंमत शून्य करून घेता. या गोष्टी लपून राहात नाहीत. या बाहेर येतातच”,

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *