Rajan Shirodkar Death । शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि एकेकाळचे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचे निकटवर्तीय राजन शिरोडकर यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती, आणि अखेर त्यांनी जीवनाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये शोककळा पसरली आहे.
राजन शिरोडकर हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेते होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचे समर्थक असलेल्या शिरोडकर यांचे शिवसेनेत महत्त्वाचे स्थान होते. त्यांनी १९९५ मध्ये युती सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली, तेव्हा शिरोडकर हे मनसेच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे व्यक्ती म्हणून पुढे आले आणि पक्षाच्या प्रारंभिक वाढीमध्ये त्यांनी मोठा हातभार लावला.
Rohit Pawar । “…त्यांनी आमचं घर फोडले” , रोहित पवारांचे धक्कादायक वक्तव्य
काही काळानंतर, काही कारणांमुळे शिरोडकर यांनी तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत पुनरागमन केले. त्यांचा मुलगा आदित्य शिरोडकर पुण्यात शिवसेना ठाकरे गटात संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहे. शिरोडकर यांचे निधन शिवसेनेतील एक मोठा तोटाच ठरला असून, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.
Uddhav Thackeray । ब्रेकिंग! उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची पुन्हा तपासणी; राजकीय वर्तुळात खळबळ