Rajasthan Accident । भीषण अपघात, लग्नातील पाहुण्यांनी भरलेली मिनी बस अनियंत्रित ट्रॉलीला धडकली, 9 जणांचा मृत्यू

Bus Accident

Rajasthan Accident । अपघाताच्या घटनांनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दररोज कुठे ना कुठे भीषण अपघात होत आहेत. सध्या देखील राजस्थामधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजस्थानच्या झालावाडमध्ये भीषण रस्ता अपघात झाला आहे. अकलेरा येथे भरधाव वेगात असलेल्या अनियंत्रित ट्रॉलीने मिनी बसला धडक दिली.

Lok Sabha Election । निवडणुकीपूर्वी पुन्हा महाविकास आघाडीला मोठा धक्का! ‘या’ आमदाराने दिला राजीनामा

हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला. रविवारी पहाटे हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसमध्ये प्रवास करणारे सर्व जण मध्य प्रदेशातून एका लग्न समारंभात सहभागी होऊन दुगरगाव येथील आपल्या घरी परतत होते. याचदरम्यान पाचोऱ्याजवळ हा अपघात झाला.

Rohit Pawar । “अजित पवारांना भाजपनं लोकल नेता बनवलं,” रोहित पवारांची जहरी टीका

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पाठवण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही यासंदर्भात कळविण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की मिनी बसचा चक्काचूर झाला. वाहनाच्या पुढील भागाचे पूर्ण नुकसान झाले आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ; म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी मला…”

Spread the love