Rajasthan Election । राजस्थान निवडणूक: काँग्रेसने जाहीर केली उमेदवारांची सहावी यादी, राजकीय हालचालींना वेग

Rajasthan Election Congress Sixth Candidate List

Rajasthan Election । राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी रात्री उशिरा उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली. उमेदवारांच्या सहाव्या यादीत २३ नावांचा समावेश आहे. यामध्ये सर्वात मोठा धक्कादायक नाव आहे ते मंत्री महेश जोशी यांचे. मंत्री महेश जोशी जयपूरच्या हवामहल मतदारसंघाचे आमदार आहेत. मात्र त्यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. जयपूर जिल्हाध्यक्ष आरआर तिवारी यांना हवामहल जागेवरून तिकीट देण्यात आले आहे. (Rajasthan Election Congress Sixth Candidate List)

Accident News । ब्रेकिंग न्यूज! भाजप खासदाराच्या गाडीचा भीषण अपघात

काँग्रेसने 179 जागांवर उमेदवार उभे केले

200 विधानसभा जागा (Assembly seat) असलेल्या राजस्थानसाठी काँग्रेसने पाचव्या यादीपर्यंत 156 उमेदवारांची घोषणा केली होती. सहाव्या यादीत समाविष्ट 23 नावांसह काँग्रेसने 179 जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यातील सर्व 200 जागांसाठी 25 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

Mark Zuckerberg Injury । मोठी बातमी! फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्गचा मोडला पाय; रुग्णालयात दाखल

राज्यात उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर असल्याची माहिती आहे. आज ५ नोव्हेंबर रोजी रविवार असल्याने नामांकनाचे काम होणार नाही. अशा स्थितीत आता सोमवार 6 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केवळ एक दिवस उरला आहे.

ST Bus । दिवाळीपूर्वीच महागला लालपरीचा प्रवास, एसटी महामंडळाकडून तिकीट दरात मोठी वाढ

Spread the love