
Rajendra Patni Passed Away । भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्याच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी आजारी होते. आणि आज अखेर त्यांनी शेवटचा श्वास घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे.”
Beed News । धक्कादायक बातमी! शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची गाडी पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
“पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो”. असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 23, 2024
ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला… pic.twitter.com/LsvH0n4upq