Site icon e लोकहित | Marathi News

Rajgad । आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; चार पर्यटक गंभीर जखमी

Rajgad

Rajgad Bees Attack । अनेक जणांना गड किल्ल्यावर फिरण्यासाठी खूप आवडते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अनेकजण गड किल्ले फिरण्यास प्राधान्य देतात. मात्र फिरताना योग्य काळजी घेणे देखील खूप गरजेचे असते. मात्र काही वेळेस आपण योग्य काळजी घेतली तरी देखील आपल्या सोबत काही दुर्घटना घडतेच. सध्या देखील काही पर्यटकांवर राजगड किल्ल्यावर मधमाशांचा हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे.

Ravikant Tupkar । “…तर शेतकरी सत्ताधाऱ्यांना राज्यात फिरू देणार नाही”, रविकांत तुपकर यांचा गंभीर इशारा

राजगड किल्ल्यावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. माहितीनुसार जवळपास 25 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. यामधील पर्यटक हे मुंबईमधील काही आहेत आणि पुण्यामधील काही आहेत. (Rajgad Bees Attack)

Pomegranate Rate । युवा शेतकऱ्याच्या कष्टाचं झालं सोनं! डाळिंबाला मिळाला ८०० रुपये किलोचा दर; कमावले लाखो रुपये

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये चार पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या पर्यटकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीक विम्याचे पैसे; धनंजय मुंडे यांची घोषणा

Spread the love
Exit mobile version