Rajinikanth Birthday । रजनीकांतची दाक्षिणात्य सुपरस्टार (Southern superstar) म्हणून ओळख आहे. अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी (Rajinikanth) काम केले आहे. आज त्यांचा 73 वा वाढदिवस (Happy Birthday Rajinikanth) आहे. त्यांचा जन्म एका सामान्य मराठी कुटुंबात झाला, परंतु आज त्यांना साऊथमध्ये देवाचा दर्जा देण्यात येतो. फक्त भारत नाही तर जगात त्यांचे चाहते आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांचा ‘जेलर’ (Jailer) हा सिनेमा रिलीज झाला होता. त्याने धमाकेदार कमाई केली आहे. (Latest Marathi News)
त्यांनी एकेकाळी बस कंडक्टर म्हणून काम केले होते. अभिनयात पाऊल ठेवल्यानंतर सुरुवातीला त्यांना केवळ 2000 रुपये मानधन दिले होते. 1983 मध्ये आलेल्या ‘अंधा कानून’ या सिनेमामुळे त्यांची वेगळी ओळख तयार झाली. (Rajinikanth Movie) सध्या ते एका चित्रपटासाठी तब्बल 100 कोटी रुपयांपर्यंत मानधन (Rajinikanth Remuneration) घेतात. जेलर या चित्रपटाठी त्यांनी 110 कोटी रुपये मानधन घेतले होते.
किती आहे संपत्ती?
रजनीकांत यांची संपत्ती 430 कोटी रुपये आहे. त्यांना महागड्या गाड्यांची आवड आहे. त्यांच्याकडे 6.5 कोटी रुपये किंमतीची रोल्स रॉयस फँटम आणि 6 कोटी रुपयांची रोल्स रॉयस घोस्ट गाड्या आहे. शिवाय 1.77 पासून 67.90 कोटी रुपयांपर्यंत BMW X5, 2.55 कोटी रुपयांची Mercedes Benz G Wagon, Premier Padmini, Toyota Innova, 3.10 कोटी रुपयांची Lamborghini Urus आणि Hindustan Motors Ambassador कार देखील आहेत. चेन्नईच्या आलिशान बंगल्याची किंमत 35 कोटी रुपये आहे. (Rajinikanth Net Worth)
Satara Accident News । साताऱ्यात ट्रक आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू
दरम्यान, रजनीकांत यांनी हिंदी, कन्नड, बंगाली आणि तेलुगू अशा भाषा असणाऱ्या चित्रपटात काम केले आहे. याशिवाय रजनीकांत यांची भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते म्हणून ओळख आहे. भारताबाहेरही त्यांचा बोलबाला आहे. जगातील सर्वात जास्त मोठा चाहता वर्ग असणारा अभिनेता म्हणून गिनिज बुकमध्ये त्यांचं नाव आहे.
संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कृषिमंत्र्याचे पुतळा दहन