Site icon e लोकहित | Marathi News

Raju Shetti । परराज्यातील ऊस निर्यातबंदीच्या आदेशावरून राजू शेट्टी आक्रमक! म्हणाले; “हिंमत असेल तर..”

Raju Shetty is aggressive on the order to ban the export of sugarcane from abroad! said; "If you dare.."

Raju Shetti । देशात मोठ्या प्रमाणावर उसाचे (Sugar cane) उत्पादन घेतले जाते. अनेकदा शेतकऱ्यांना कमी दराने ऊस विकावा लागतो. अशातच आता राज्य सरकारने (State Govt) राज्यातील ऊस बाहेरील राज्यात घालण्यास बंदी (Sugarcane export ban) घातली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. सरकारच्या या निर्णयावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. (Latest Marathi News)

Icc World Cup । भारतीय संघात मोठा बदल! स्टार खेळाडू अचानक बाहेर, नेमकं कारण काय?

“बाहेरील राज्यात ऊस पाठवू नये, असे सांगण्याचा नैतिक अधिकार ट्रिपल इंजिन सरकारला नाही. आम्ही या आदेशाला ऊसाच्या सरीत गाडून टाकू. आम्हाला ज्या ठिकाणी चांगला भाव मिळेल त्या ठिकाणी आम्ही ऊस पाठवणार आहे. जर हिंमत असेल तर तुम्ही आम्हाला आडवून दाखवा,” असे आव्हान राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे.

Accident News । गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, एक ठार तर १९ जण जखमी

“केंद्र सरकारने वन नेशन वन मार्केटचे (One Nation One Market) धोरण अवलंबले असून त्याला शेतीतील कोणतीही शेती उत्पादने आणि कोणतेही पीक अपवाद नाही. सरकारने हा निर्णय लवकरात लवकर मागे घ्यावा. असे निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे का याचे आत्मपरीक्षण त्यांनी करावे. भलेही कारखानदारांच्या राज्य सरकारनं कितीही दाढ्या कुरवाळल्या तरी आम्हाला जो कारखाना जास्त दर देणार त्यालाच आम्ही ऊस देणार”, अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.

Palghar Crime । माता न तू वैरिणी! पाच दिवसांच्या चिमुरडीचा आईने घेतला जीव, धक्कादायक कारण समोर

Spread the love
Exit mobile version