
राज्य सरकारने एफआरपी दोन तुकड्यात देण्याचा निर्णय नुकताच घेतला. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) आक्रमक झाले आहेत. तसेच राज्यातील साखर कारखाने व कारखानदार यांच्यावर देखील ते चांगलेच संतापले आहेत.
भर रस्त्यावर बायकोने नवऱ्याला दिला चोप; पाहा VIDEO
कारखानदार काटा मारत असल्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत आहे. यावर बोलताना राजू शेट्टी यांनी कारखान्यांचे ऑडिट करणाऱ्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सोबतच त्याचे चेअरमन शरद पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे.
पिंपरी-मोरोची रस्त्याची दुरावस्था, ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
” ज्या कुटुंबामध्ये एक लाख टन ऊसाचं गाळप केलं जातं, त्या कुटुंबाचा कुटुंबप्रमुख जर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा प्रमुख असेल तर हे ऑडीट नीट होईल का?” असे म्हणत राजू शेट्टी यांनी थेट शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली आहे.
क्रिकेट विश्वात सुरवात? लहान वयात वडिलांचे निधन; वाचा विराट कोहलीच्या जीवनातील काही किस्से
यंदाच्या वर्षी अनेक कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात इथेनॉलचं उत्पादन केलं आहे. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला असून शेतकऱ्यांना पैसे देऊन देखील त्यांच्याकडे पैसे उरले आहेत. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले पाहिजेत. असे मत राजू शेट्टी यांनी मांडले आहे.