राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. यामुळे राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून हल्ला करण्यात आला आहे. आता या प्रकरणावर राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बिग ब्रेकिंग! शाईफेक प्रकरणात ताब्यात घेतलेल्या पत्रकाराची सुटका
राजू शेट्टी म्हणाले, शाई पेनमध्येच धारदार असते दौतामध्ये नाही, आम्ही असं समजायचो. मात्र दौतमध्ये शाईसुध्दा शस्र्त्रासारखे काम करते.हा शोध लावल्याबद्दल तपास अधिकाऱ्याला रेमेन मॅगेसस पुरस्काराने सन्मानित केल पाहिजे. अशा शबनमध्ये राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा तर नवीनच नखरा! साडी घालून उर्फी जावेद पोहचली विमानतळावर; पाहा VIDEO
याबाबत राजू शेट्टी यांनी एक फेसबुक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटल आहे की, “शाईफेकीचे समर्थन करणे चुकीचे!!! पण शाई फेकणा-या युवकावर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते पाहता सरकार तालिबानी सारखे वागू लागले आहे असे वाटते. ३०७ म्हणजे धारदार शस्त्राने जीवे मारण्याचा प्रयत्न व ३५३ म्हणजे सरकारी कामात अडथळा याचा अर्थ महापुरषांचा अपमान करणे हे सरकारी काम आहे का? मग हा कायदा दिल्लीतील शेतकरी आंदोलनात ज्या सरकारने ७०० हून अधिक शेतक-यांचा बळी घेतला त्याला जबाबदार असणा-यांच्यावर ३०२ सह ही कलमे का लावण्यात आले नाहीत”.
शेतकऱ्यांसाठी आनंददायक! पीएम किसान योजनेतील हप्त्याची रक्कम वाढण्याची शक्यता