
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी साखर आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा एफआरपी आणि इतर मागण्यांसाठी निघणार असल्याची माहिती समोर आली आहे.
खुशखबर! शेतकऱ्यांना कुट्टी मशिनसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; वाचा सविस्तर
स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या उपस्थितीत हा मोर्चा होणार आहे. मागच्या वर्षीची शेतकऱ्यांची एफआरपी आणि त्यावर अधिक रक्कम लवकरात लवकर मिळावी, त्याचबरोबर साखर कारखान्यांमधील वजनकाटे ऑनलाईन काढा, अशा अनेक वेगेवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा होणार आहे. या मोर्चाचा फायदा ऊस उत्पादकांना नक्कीच होईल असा अंदाज देखील व्यक्त केला जात आहे.
पावसाच्या पाण्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील ‘या’ गावांचा संपर्क तुटला; वाचा सविस्तर
अतिरिक्त उसाचा प्रश्न हा राज्यामध्ये गंभीर विषय बनला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यात ऊस जास्त प्रमाणात असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांनी अतिरिक्त ऊस घेतले त्यामुळे मराठवाड्यातील ऊसाचे गाळप होऊ शकले. पण असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस शेतातच आहे.