राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारला धारेवर धरले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी ( Raju Shetti) यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी नुकताच पुण्यात मोर्चा देखील काढण्यात आला. दरम्यान ‘शेतकऱ्यांकडून लुटलेला पैसा राजकारणासाठी वापरला जातोय’, असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर तेजीत
“ऊस उत्पादक शेतकऱ्याला दरवर्षी संघर्ष करावाच लागतो. राज्य सरकार शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. यावरूनच या सरकारची नितीमत्ता दिसून येत आहे. सरकार देखील शेतकऱ्यांप्रती विरोधकांप्रमाणे वागत आहे.”, अशी टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच या मोर्चादरम्यान शेतकऱ्यांच्या मागण्या ( Farmer’s Demands) देखील त्यांनी सरकारसमोर मांडल्या आहेत.
गौतमी पाटीलने अर्धवट का सोडलं शिक्षण? का ठेवले लावणी क्षेत्रात पाऊल? वाचा सविस्तर माहिती
एफआरपी ( FRP) दोन टप्प्यात विभागून देण्याचा सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना मान्य नसल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काटा मारला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होतीये. हे टाळण्यासाठी वजनकाटे ऑनलाइन करायला हवेत. तसेच सर्व ऊस तोडणी कामगार तोडणी महामंडळामार्फतच साखर कारखान्यांना पुरवावेत. या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
संजय राऊत यांची न्यायालयातून सुटका; 100 दिवसांचा वनवास अखेर आज संपला