Rajya Sabha Elections । मुंबई : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) राज्यसभा निवडणुका पार पडणार आहेत. सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी सात जणांनी अर्ज केले होते. (Rajya Sabha Election 2024) पण निवडणुकीपूर्वी एक मोठा ट्विस्ट आला आहे. सात उमेदवारांपैकी एका उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला असल्याने आता निवडणुक बिनविरोध होणार आहे. (Latest marathi news)
Attack on MLA । काँग्रेस आमदाराची फोडली कार, कार्यक्रमावेळी घडली धक्कादायक घटना
20 फेब्रुवारी ही उमेदवारीला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अशातच आता राज्यातून राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक बिनविरोध झाली असून या निवडणुकीसाठी दाखल झालेला अपक्ष उमेदवाराचा सातवा अर्ज छाननीत बाद झाला आहे. 20 तारखेला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात येईल.
Ajit Pawar । ‘अजित दादा भाषणाच्यावेळी बाथरुममध्ये पळायचे’; बड्या नेत्याचं सर्वात मोठं वक्तव्य
कोणी केले होते अर्ज?
भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे या तिघांनी तर शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे यांनी अर्ज दाखल केले. अपक्ष म्हणून विश्वास जगताप (Vishwas Jagtap) यांनी अर्ज केला होता. पण या निवडणुकांसाठी सूचक, अनुमोदक म्हणून आमदारांच्या सह्या लागतात. पण त्याची पुर्तता जगताप यांच्याकडून करता न आल्याने त्यांचा अर्ज छाननीत बाद केला आहे.
Supriya Sule । सुप्रिया सुळेंना धक्का बसणार? अजित पवार बारामतीतुन तगडा उमेदवार उभा करण्याच्या तयारीत