
अधिकारी व्हायचे स्वप्न उराशी बाळगून राज्यातील कितीतरी तरुण राज्यसेवा व लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत आहेत. दरम्यान नुकतीच राज्यसेवा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. ( MPSC 2021 list) आयोगाच्या संकेतस्थळावर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
वयोवृद्द आजोबांनी बच्चू कडू यांची गाडी आडवली आणि म्हणाले, तुम्ही गद्दार…” पाहा VIDEO
यामध्ये सांगलीच्या प्रमोद चौगुलेने सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे ( First in state). तर सोनाली म्हात्रे ही मुलींच्यात पहिला क्रमांक मिळवून राज्यात तिसरी आली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर शुभम पाटील आहे.
दरम्यान 2021 च्या यादीत पहिला आलेला प्रमोद चौगुले ( Pramod Chaugule) सध्या नाशिक ( Nashik) येथे उद्योग आणि उपसंचालक पदावर कार्यरत आहे. मागील यादीमध्ये सुद्धा त्याने पहिला क्रमांक पटकावला होता. तो पश्चिम महाराष्ट्रातील सांगली या जिल्ह्यातील आहे.
मागच्या पाच वर्षात अरबी समुद्रातील शिवस्मारक का झाले नाही? विधानसभेत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल
महत्त्वाची बाब म्हणजे राज्यसेवा आयोगाने जाहीर केलेल्या यादीसोबत संवर्गाचे पसंतीक्रम (Preference Number) सादर करण्यासाठी 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन दिली आहे. या काळात उमेदवारांनी आपला पसंतीक्रम सादर करावा असं आवाहन एमपीएससीने केले आहे.
तसेच ही प्रसिध्द करण्यात आलेली गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरूपाची आहे. अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे व कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. तसेच गुणवत्ता क्रम देखील बदलू शकतो.
मागच्या पाच वर्षात अरबी समुद्रातील शिवस्मारक का झाले नाही? विधानसभेत अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल