Site icon e लोकहित | Marathi News

राखीनं उडवली मलायकाची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल

मुंबई ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या काही महिन्यांपासून पती आदिल दुर्राणीसोबत सुरूअसलेल्या भांडणामुळे चर्चेत आहे. आदिलसोबतच्या कायदेशीर लढाईत राखी सावंत सतत चर्चेत असते. अनेकदा राखी ट्रोलसर्च्या निशाण्यावरदेखील असते. आता पुन्हा एखदा राखी चर्चेत आली आहे.

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाड यांच्या बॉडीगार्डची आत्महत्या

आता मात्र कोणाताही ड्रामा न करता राखीनं एका अभिनेत्रीची खिल्ली उडवली आहे. तोच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याव्हिडिओत राखीनं बोल्ड आणि चर्चित अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) हीची खिल्ली उडवली आहे. मलायकाच्या चालण्यावरुन अनेक व्हिडिओ आणि मिम्स शेअर केले जातात. आता राखीनंदेखील तेच केलं आहे.

धोनीच्या आयुष्यात बायकोच्या आधी खास होती ‘ही’ व्यक्ती; लग्न करणार होता पण…

या व्हिडीओमध्ये राखी मलायकाची तिच्यासारखी चाल करून खिल्ली उडवत आहे, ज्याने मलायकाचे चाहते भडकल्याचं पहायला मिळत आहे. राखी सावंतने मलायकाला फॉलो करत तिची कॉपी केली आहे. राखी जीममधून बाहेर पडताच पापाराझी छायाचित्रकारांनी तिला घेरलं. यावेळी राखीने मलायकाची केलेली कॉपी पाहून सगळ्यांनाच हसू अनावर झालं.

मोठी बातमी! श्रीगोंदा दूध भेसळ प्रकरणी घातक रसायनांचा साठा जप्त

मलायकाला तर सगळ्यांनाच आवडते. मलाही मलायका खूप आवडते. आता यापुढे मी असंही चालणार असंदेखील राखीनं व्हिडिओमध्ये म्हणलं आहे. यावरुन अनेकांनी राखीला ट्रोल केलं आहे. तुमच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे, तुम्हाला वाईट वाटत नाही असं एका यूजरने कमेंट करत लिहिलं आहे.

Spread the love
Exit mobile version