
Rakhi Sawant । मुंबई : ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) होय. राखी सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. राखी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकादा राखीला ट्रोल देखील केले जाते. राखी खुप वेळा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकते. राखी तिच्या बिंधास्त वक्तव्यामुळेही नेहमीच चर्चेत येते.
शरद पवारांना मोठा धक्का ते अनेक गौप्यस्फोट; वाचा अजित पवार गटाच्या पत्रकार परिषदेतील मुद्द्ये
राखीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चार वर्षांत दोन वेळा लग्न आणि पतीपासून विभक्त होणारी राखी आता पुन्हा एकदा नवऱ्यासाठी नवस करत आहे. राखी सावंत पावसात उभी राहून आपल्या डोक्यावर अंडी फोडत देवाकडे नवऱ्याची मागणी करताना या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता.
सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. viralbhayani या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडीओ चर्चेत असून. नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओवर वेगेवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
सिव्हिल इंजिनियरची नोकरी न करता तरुणाने केली लाल केळीची शेती! आज करतोय लाखोंची उलाढाल