
सध्या राखी सावंत सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. मागच्या काही दिवसापूर्वी राखी सावंतने आदिल खानवर (Adil Khan) गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचं राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणाली आहे. दरम्यान राखीने आदिल खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. आता राखीच्या तक्रारीची दखल मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी घेतली असून आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
ब्रेकिंग! अभिजीत बिचुकलेला धमकीचा फोन
आदिलला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेताच राखी सावंतला याबद्दल विचारण्यात आले. राखी सावंत याबाबत माध्यमांशी बोलत होती. त्याचवेळी माध्यमांशी बोलत असतानाच राखी सावंत चक्कर येऊन पडली. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘धडाकेबाज’ चित्रपटातील कवट्या महाकाल माहिती आहे का? पाहा मास्कमागचा खरा चेहरा
दरम्यान, राखीने काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खान (Adil Khan) याच्यासोबत कोर्टात लग्न केले. यावेळी लग्नानंतर तिने आपला धर्म बदलून फातिमा असे नाव ठेवले. सुरुवातीच्या काळात आदिल खान आपल्या लग्नावर व कोर्टमॅरेजवर मौन बाळगून होता. परंतु, काही दिवसांनी आदिल खानने देखील या लग्नाला होकार दिला होता.
सर्वात मोठी बातमी! आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक
आता लग्नानंतर लगेच काही दिवसातच राखीने पतीवर फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आदिलला पोलिसांनी नेमक्या कोणत्या कारणाने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून राखी आदिल खानवर गंभीर आरोप करत आहे. आता राखीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आदिलला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आव्हानांवर एकनाथ शिंदे यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “मी छोटे मोठे…”