
अभिनेत्री आणि आयटम गर्ल राखी सावंत (Rakhi Sawant) नेहमीच चर्चेत असते. राखी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती कधी तिचे फोटो तर कधी व्हिडिओ (video) शेअर करत असते. यादरम्यान राखी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री राखीने तिच्या पती विरोधात एफ फायर दाखल केली आहे.
“संजय राऊत बँड पथकातील खुळखुळा वाजवणाऱ्या लहान मुलासारखे”, भाजपच्या नेत्याने राऊतांवर केली जहरी टीका
राखीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदिलला अटक केली आहे. तर राखी याविषयी नवनवीन खुलासे करत आहे. आता आदिलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ विरल भय्यानी या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीला मित्रपक्षाकडून धक्का! 91 जणांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश
सध्या सोशल मीडियावर आदिलची गर्लफ्रेंड गरोदर असल्याची चर्चा सुरू आहे. यावर राखी म्हणाली, आदिलची गर्लफ्रेंड तनु गरोदर असल्याची बातमी समजताच मला धक्का बसला आहे. आदिलने माझ्याबरोबर बाळाचं प्लॅनिंग करुन गर्लफ्रेंडला प्रेग्नंट केलं. तसेच या व्हिडिओमध्ये राखीने आदिलवर असलेल्या बलात्काराच्या आरोपाविषयी माहिती दिली आहे.
“संजय राऊत बँड पथकातील खुळखुळा वाजवणाऱ्या लहान मुलासारखे”, भाजपच्या नेत्याने राऊतांवर केली जहरी टीका
यादरम्यान, राखीच्या आईच्या निधनानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंतने आदिलवर मारहाण केल्याचे आणि पैसे लुटल्याचे आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली.