मागच्या काही दिवसापूर्वी राखी सावंतने आदिल खानवर गंभीर आरोप केले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाच आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर सुरू असल्याचं राखी सावंत म्हणाली आहे. दरम्यान आता राखीने त्या मुलीचे नाव देखील उघड केले आहे. राखीने दिलेल्या माहितीनुसार आदिल खानच्याच्या गर्लफ्रेंडचे नाव तनु असे आहे.
अजित पवारांनी सांगितले डोक्यावरील केस जाण्याचे कारण; म्हणाले, “रामदेव बाबांनी सांगितले म्हणून…”
सध्या पुन्हा एक राखीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी आदिलबाबत अनेक धक्कादायक खुलासे करत आहे. राखीने सांगितले की “ एक दिवस मी नमाज पठण करत होते त्यावेळी आदिलने मला लाथेने मारलं आहे. तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला. नमाज पठण करत असतानाच आदिलने मला मारलं”, असं राखी म्हणाली आहे.
गद्दारांचे सरकार फक्त होर्डिंग्जवाल्यांची कर्ज मुक्ती करत आहे; आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
दरम्यान, राखी बिगबॉस मराठी मधून बाहेर पडल्यापासून राखी एकाच वेळी अनेक संकटांना तोंड देत आहे. एकीकडे तिची आई गंभीर आजाराने त्रस्त होती. तर दुसरीकडे तिचे लग्न धोक्यात आले आहे. ब्रेन ट्युमर व कॅन्सर सारख्या आजारांनी नुकतेच राखीच्या आईचे निधन झाले आहे. “आदिलमुळे माझी आई जिवंत नाही, आदिलने तिच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत. जर माझ्या आईवर वेळीच उपचार झाले असते, तर माझी आई कदाचित आज जिवंत असती”, असं राखी म्हणाली आहे.
तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपात मृतांचा आकडा चौदाशे पार, तर पाच हाराजांपेक्षा जास्त लोक जखमी