मागच्या काही दिवसापासून राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान (Rakhi Sawant and her husband Adil Khan) त्यांच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आले आहेत. अभिनेत्री राखीने तिच्या पती विरोधात एफ फायर दाखल केली आहे. राखीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदिलला अटक केली आहे. तर राखी याविषयी नवनवीन खुलासे करत आहे.
दरम्यान राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ instantbollywood या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये ती आदिलबद्दल बोलताना दिसत आहे. त्याचबरोबर राखीसोबत या व्हिडीओमध्ये शर्लिन चोप्राही दिसत आहे.
यामध्ये राखी म्हणत आहे की, “मी आदिलवार खूप मनापासून प्रेम केलं मात्र त्याने खूप गैरवर्तन केलं आहे. तो ड्रग्ज घ्यायचा आणि मला मारहाण करायचा. याबाबत पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत. आता पोलीस याबाबत असून तपास करत आहेत. असं राखी सावंत यावेळी म्हणाली आहे.
धक्कादायक! पगार न झाल्यामुळे एसटी चालकाने आत्महत्या करत संपवले आयुष्य
दरम्यान, राखीच्या आईच्या निधनानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंतने आदिलवर मारहाण केल्याचे आणि पैसे लुटल्याचे आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली.
ठरलं! शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ‘या’ तारखेला जमा होणार पीएम किसान योजनेचा १३वा हप्ता