
अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. इतकंच नाही तर राखी सावंत लोकांचे मनोरंजन करण्यात आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात नेहमीच अग्रेसर असते. दरम्यान राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. त्याचे फोटो देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
“नेत्यावर बोट उचलण्यालायक काही नसलं की बायकोच्या मागे लागतात”; अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
या लग्नाबाबत आदिल दुर्रानीने मौन बाळगले आहे. तर आता दुसरीकडे राखी सावंत प्रेग्नेंट असल्याचे देखील बोललं जात आहे. एका मुलाखतीत राखी सावंतने फॅमिली प्लॅनिंगबद्दल मोठं भाष्य केले आहे. यामुळे राखी लवकरच आई होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
ब्रेकिंग! सिन्नर- शिर्डी महामार्गावर भीषण अपघात
राखी म्हणाली, “अदिलसोबत लग्न केल्याचा मला आनंद आहे. मात्र, आदिल लग्नाला नकार देतोय हे ऐकून मला धक्का बसलाय. मागच्या सात महिन्यांपासून मी आदिलला सांगत आहे की, आपण लग्नाबद्दल सर्वांना सांगू. मी सेलिब्रिटी असून माझे जीवन कोणापासून लपून राहू शकत नाही. लग्नानंतर प्रेग्नेंसी किंवा इतर काहीही गोष्टी होऊ शकतात”. असं राखी सावंत म्हणाली आहे.
राज्यात लवकरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा