बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून राखी सावंतला ओळखले जाते. कोणत्या न कोणत्या कारणाने ती कायम चर्चेत असते. मध्यंतरी तर नरेंद्र मोदींची ( Narendra Modi) भेट घेणार असल्याच सांगत राखीने नेटकऱ्यांच लक्ष वेधून घेतलं होतं. दरम्यान राखी सावंतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका लग्नातील आहे. त्याच झालं असं होतं की, नुकतीच राखी सावंत एका लग्नामध्ये फुल मेकअप करून गेली होती. ( Viral Video of Rakhi Sawant)
गौतमी पाटीलची राजकारणात चर्चा! अजित पवारांनंतर आता अब्दुल सत्तारही म्हणाले की…
या लग्नामध्ये एक व्यक्ती एका लहान मुलाला रखीकडे आणून देतो. त्यानंतर राखी सावंत त्या बाळाला आपल्या कडेवर घेते. परंतु, राखी सावंत हिच्याकडे बघताच तो लहान मुलगा घाबरून जोर जोरात रडायला लागतो. त्या लहान मुलाचे रडणे पाहून काही वेळासाठी राखी सावंत सुद्धा घाबरते. तो मुलगा राखी सावंत आणि तिचा मेकअप पाहून इतका घाबरून रडत असतो की, तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसायला लागतात. ( Boy saw rakhi sawant in make up and starats crying )
यावर एका युजरने कमेंट केली आहे की, हा मुलगा तर लहानच आहे पण भले भले लोक सुद्धा राखीला पाहून घाबरतात. खरंतर लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी राखी नेहमीच असं काहीतरी करत असते. याआधी सुद्धा राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो व्हिडीओ एका विमानतळावरील असून त्यामध्ये राखी एका शॉपवर इडली खरेदी करत आहे. मात्र नंतर बिल भरताना इडलीची किंमत ऐकून राखीला धक्का बसल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी विमानतळावरच रोजा सोडताना दिसत आहे.
Health Updates | जेवणाची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या सविस्तर