Rakhi Sawant । अभिनेत्री राखी सावंतसाठी धक्कादायक बातमी समोर

Rakhi Sawant

Rakhi Sawant । अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 14’ ची स्पर्धक राखी सावंत सतत चर्चेच्या केंद्रस्थानी येत असते. अनेक वेळा ती तिच्या खाजगी आयुष्यामुळे ही चर्चेच्या विषय ठरते. अशातच राखी सावंतच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण नार्कॉटिक्स कंट्रोल ब्युरोची माजी अधिकारी समीर वानखडे यांनी त्यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे, काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घेऊया सविस्तर.

Pune Crime । धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने केला खून

समीर वानखेडे यांनी राखी सावंत आणि तिचे वकील अली काशीफ खान यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला असून त्यांनी 11 लाख रुपयांची भरपाई मागितली आहे, राखी सावंत आणि तिच्या वकिलांनी आपली प्रतिमा डागळण्याचा आणि बदनामीचा प्रयत्न केला असल्याने गोरेगाव येथील दिंडोरी शहर दिवाणी न्यायालयात वानखेडे यांनी खटला दाखल केला आहे. दरम्यान अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यनला एनसीबीने अटक केल्यानंतर राखी सावंतने त्याला पाठिंबा दिला होता. तिने याबाबत एक व्हिडिओ देखील शेअर केला होता.

Lok Sabha Elections 2024 । लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींना सर्वात मोठा धक्का!

खटल्याबाबत काशीफ खान यांनी सांगितले की, “समीर वानखेडे यांनी आपल्या विरोधात खटला योग्य आहे असे सिद्ध केले तर मी त्यांना 11.01 रुपये देईल. सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्याने याबाबत मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, ” असे काशिफ खान यांनी सांगितले. तसेच याबाबत राखी सावंतने देखील प्रतिक्रिया दिली नाही.

Rohit Pawar । “बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून…”, रोहित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Spread the love