सलमान खानसाठी राखी सावंतने घेतला लॉरेन्स बिश्नोई सोबत पंगा; म्हणाली, “धमक्या देणाऱ्याचे डोळे फुटून…”

Rakhi Sawant takes Panga with Lawrence Bishnoi for Salman Khan; Said, "The eyes of the one who threatens..."

राखी सावंत (Rakhi Sawant) सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मागच्या काही दिवसापासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. राखी सावंतने तिचा पती आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामुळं आदिल दुर्रानी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान आदिलला अटक झाल्यापासून राखी सावंत अनेक मोठमोठे खुलासे करत आहे.

TMKOC आता मोठ्या पडद्यावर, निर्मात्यांनी केली मोठी घोषणा!

मागच्या काही दिवसापूर्वी झालेल्या आदिल सोबतच्या वादांनंतर राखी सावंत सोशल मीडियावर सतत चर्चेत आहे. दरम्यान, राखीने सध्या सलमान खान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे राखी पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.

आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, राखी सावंत ही सलमान खानला (Salman Khan) आपला भाऊ मानते. सलमानने यापूर्वी वाईट काळात राखी सावंत हिची मदत देखील केलीय. राखी सावंत हिची आई दवाखान्यात असताना सलमान खान याने तिच्या आईच्या उपचारासाठी मदत केली होती. असा खुलासा स्वतः राखीने मागच्या काही दिवसापूर्वी केला होता.

बिग ब्रेकिंग! ‘या’ अभिनेत्रीने गळफास घेत २५ व्या वर्षीच संपवले आयुष्य

मागच्या काही दिसवापूर्वी सलमान खान याला लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याने थेट तुरुंगामधून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर सर्वाना धक्का बसला. पोलिसांनी सलमान खानची सुरक्षा देखील वाढवली. आता या प्रकरणावर राखी सावंतने मोठे वक्तव्य केले आहे. राखी सावंत म्हणाली, “सलमान हा माझा भाऊ आहे तो खूप चांगला आहे. मागच्या काही दिवसापूर्वी त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे मात्र यावर बॉलिवूडमधून कोणीही काही बोललं नसल्याचं राखी यावेळी म्हणाली आहे.

आनंदाच्या शिध्यावरुन अजित पवारांची सरकारवर जोरदार टिका; म्हणाले…

त्याचबरोबर पुढे ती म्हणाली, “सलमान माझा भाऊ आहे त्यामुळे मी त्याच्या बाजूने बोलणार. सलमान खान याला धमक्या देणाऱ्याचे डोळे फुटून जावो. मी लॉरेन्स बिश्नोई याला विनंती करते आणि संपूर्ण बिश्नोई समाजाची माफी मागते. मात्र त्यांनी माझ्या भाईला काही करू नका. असं राखी यावेळी म्हणाली आहे.”

खळबळजनक घटना! धावत्या रेल्वेत प्रवाशाला पेटवले

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *