Site icon e लोकहित | Marathi News

राखी सावंतने सुटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया म्हणाली, “मला चक्कर येतय, माझा बीपी देखील…”

Rakhi Sawant's first reaction after release said, "I am feeling dizzy, my BP too..."

अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) ही ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाते. राखी ही टीव्ही विश्वातील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. राखी सावंत सोशल मीडियावर तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. दरम्यान, बऱ्याच दिवसांपूर्वी राखी सावंत हिच्यावर शर्लिन चोप्राने आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप होता. आता याप्रकरणी राखी सावंतला अटक देखील करण्यात आली होती.

PHOTO: अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा!

आंबोली पोलिसांनी राखी सावंतला काल ताब्यात घेतले होते. यानंतर तब्ब्ल सहा तासाच्या चौकशीनंतर तिची सुटका झाली आहे. या सुटकेनंतर पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर राखी सावंतने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात; खासगी बसला भीषण अपघात, १ जागीच ठार

राखी सावंत म्हणाली, “ माझ्या आईची प्रकृती गंभीर झाली आहे त्यामुळे मी फक्त माझ्या आईला भेटायला रुग्णालयात आले आहे. मला डॉक्तरांचा फोन आला होता तिची प्रकृती ठिक नाही. मला चक्कर येतय, माझा बीपी देखील लो झालाय, आज मी दिवसभर जेवणही केलेलं नाही,” या शब्दांत राखीने प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार, धनुष्यबाण नेमका कुणाचा? आज होणार सुनावणी

Spread the love
Exit mobile version