Site icon e लोकहित | Marathi News

Ranveer Sing Photoshoot: रणवीरच्या बोल्ड फोटोशूटवर राखी सावंतचा मजेदार व्हिडिओ व्हायरल, पाहा VIDEO

Rakhi Sawant's funny video on Ranveer's bold photoshoot goes viral, watch the VIDEO

मुंबई : रणवीर सिंगच्या (Ranveer Sing) बोल्ड फोटोशूटवरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाहीये. सोशल मीडियावर रणवीर सिंगला ट्रोल केले जात आहे. मात्र रणवीरला कलाविश्वातून पूर्ण पाठिंबा मिळाला आहे. बॉलिवूडपासून टीव्हीपर्यंत अनेक स्टार्सनी रणवीर सिंगच्या फोटोशूटवर आपली प्रतिक्रिया देत ट्रोलला प्रत्युत्तर दिले आहे. राखी सावंतनेही या प्रकरणी रणवीरला पाठिंबा दिला असून आता राखीने पुन्हा एकदा या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले आहे. एक मजेदार व्हिडिओ शेअर करत राखीने सांगितले की, रणवीर सिंगने बोल्ड फोटोशूट करून भारतीय महिलांवर उपकार केले आहेत.

राखी सावंतने (Rakhi Sawant) तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती रणवीर सिंगच्या बोल्ड फोटोंवर बोलताना दिसत आहे. मी नुकतीच दुबईहून आली आहे आणि रणवीरच्या बोल्ड फोटोशूटबद्दल मी अजूनही ऐकत असल्याचे राखी सांगत आहे. माझ्या प्रिय मित्रा, तू असे फोटोशूट करत जा, मला तुला असे बघायचे आहे.’ या व्हिडिओमध्ये राखीने रणवीर सिंगसाठी ‘हाय गर्मी’ हे गाणेही गायले आहे.

राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते मजेशीर कमेंट करत आहेत. एका यूजरने राखी सावंतचा बॉयफ्रेंड आदिलबद्दल बोलत लिहिले कि, ‘आदिल तुला मारून टाकेल.’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘तुम्ही रणवीरचा घटस्फोट घ्याल.’ राखीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

याआधीही राखी सावंतने रणवीरच्या बोल्ड फोटोशूटवर वक्तव्य केले होते, ज्यामध्ये तिने म्हटले होते की, मला फोटो कुठेही न्यूड आढळला नाही, तुमचे डोळे असे झाले आहेत. रणवीरबद्दल कोणी काही बोलणार नाही. या फोटोमागे एक कथा आहे, जी रणवीर सांगू शकत नाही, म्हणून मी सांगते. “लंडन, अमेरिका, दुबई येथे खूप गरम होत आहे, पुढचा माणूस काय करेल? एसी काम करत नव्हता, तो फक्त कपडे काढून आंघोळीला गेला. यामध्ये दोन माकडे त्यांचे कपडे घेऊन पळून गेली. यात रणवीर काय करेल मित्रांनो? राखीच्या या मजेशीर प्रतिक्रियेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Spread the love
Exit mobile version