सध्या राखी सावंत आणि आदिल खान ( Rakhi Sawant and Adil Khan) यांच्यात झालेल्या वादामुळे ते दोघे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. राखीच्या आईच्या निधनानंतर राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
चिंचवड, कसबा पोटनिवडणुकीसाठी अजित पवार सक्रिय; कार्यकर्त्यांना दिले ‘हे’ महत्त्वाचे सल्ले
राखी सावंतने आदिलवर मारहाण केल्याचे आणि पैसे लुटल्याचे आरोप करत त्याच्याविरोधात तक्रार देखील दाखल केली. त्यांनतर आदीलला पोलिसांनी ताब्यात घेतले व काल त्याची चौकशी होऊन आता आदीलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता यावर राखी सावंतच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मग माझ्यामुळे तर भारत उद्ध्वस्त होईल…”; अभिनेत्री उर्फी जावेदचे ट्विट चर्चेत
कोर्टबाहेर राखीच्या वकिलांना या प्रकरणाबाबत विचारले. यावेळी ते म्हणाले, आदिलविरोधात एवढे पुरावे आहेत की त्याच्यावर फक्त ४९८ किंवा ३७७ नाही तर आणखी आयपीसी कलमांतर्गत देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. पती-पत्नीच्या नात्यात कोणताही पडदा नसतो.” अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडी सरकार पडण्यास नाना पटोलेच जबाबदार! शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट