बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत (Rakhi Sawant) होय. राखी सावंत सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. राखी तिचे व्हिडिओ (video) आणि फोटो (Photo by Rakhi Sawant) पोस्ट करत चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. सध्या राखी सावंत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
सामानासह फरार झालेला कॅब ड्रायव्हर तासाभराने आला अन् नशेत…
गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखीने तिचा पती आदिल खान विरोधात एफ फायर दाखल केली आहे. राखीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी आदिलला अटक केली आहे. यादरम्यान राखी अनेक नवनवीन खुलासे करत आहे. सध्या राखीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये राखी ढसढसा रडताना दिसत आहे. इतकंच नाही तर ती स्वतः लाच चापट मारून घेत आहे.
राखीला आदिलसोबत विवाह करून पश्चाताप होत असल्याचे समोर आला आहे. रडत रडत राखीने तिची व्यथा सांगितली आहे. राखी म्हणते, मी त्याच्यावर का विश्वास ठेवला.. मी त्याच्यावर का प्रेम केले.. मी असे करायला पाहिजे नव्हते. यादरम्यान राखीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. तसेच नेटकरी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.
पहाटेचा शपथविधी पुन्हा एकदा चर्चेत, फडणवीसांनी शरद पवारांना दिलं