
मुंबई : अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) या चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी मोठी घसरण झाली आहे. माहितीनुसार, रक्षाबंधनाने पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी २५ टक्के कमी कमाई केली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चित्रपटाला सुट्ट्यांचा फायदा होताना दिसत नाही.
बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 9 कोटी रुपयांची कमाई केली होती. रक्षाबंधनाच्या दुसऱ्या दिवसाबद्दल बोलायचे झाले तर शुक्रवारी ६ ते ६.४० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. म्हणजेच अॅडव्हान्स बुकिंगनंतरही अक्षय कुमारचा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यात अयशस्वी ठरला आहे.
दरम्यान, लाल सिंह चड्ढाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईबद्दल बोलायचे तर शुक्रवारी चित्रपटाची कमाई 35 टक्क्यांनी घसरली. रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 7.75 ते 8.25 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे, प्रदेशानुसार कमाईचा विचार केल्यास चित्रपटाने दिल्ली-एनसीआर आणि पूर्व पंजाबमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तर दिल्ली आणि मुंबईतील निवडक चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची मानाची गर्दी पाहायला मिळाली.