Raktchandan: रक्तचंदनाला आंतरराषट्रीय बाजारात लाखोंची मागणी, रक्तचंदनाचा ‘हा’ आहे औषधी उपयोग

Raktchandan has a demand of lakhs in the international market, 'this' is the medicinal use of raktchandan

मुंबई : अश्या बऱ्याच आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहेत ज्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात मोलाचा वाटा असतो. आता रक्तचंदनच घ्या ज्याचा उपययोग डोके दुखी ,पित्त, त्वचा रोग, फोड, ताप येणे, विंचू दंश तसेच प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर इत्यादी आजरांवर उपयोग होतो. रक्तचंदनाचे लाकूड पूर्वापार काळापासून वापरात आले आहे. रक्तचंदन ही औषधी वनस्पती चंदनाचीच एक जात आहे.

Neeraj Chopra: नीरज चोप्राने पुन्हा रचला इतिहास, डायमंड ट्रॉफी जिंकणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू

शास्त्रीय भाषेत रक्तचंदनाला “टेरोकाप्स सॅन्टलिनस’ असे म्हणतात. पण दुर्दैवाने रक्तचंदन या वृक्षाची मोठ्या प्रमाणावर तोड करून त्याच्या लाकडाची तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे त्याची तोड करण्यावर बंदी घातली आहे. लाल रक्तचंदनाला भारत तसेच चीन, जपान म्यानमार आणि इस्ट एशिया या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मागणी असते चंदनाचे अनेक औषधीगुणधर्म आहेत.

दररोज बिट खाल्ल्याने शरीरास होतात ‘हे’ लाभदायक फायदे; वाचा सविस्तर माहिती

रक्तचंदनाचा उपयोग

या रक्तचंदनाच्या लाकडापासून बाहुली बनवली जाते. अनेक लोकं याला उगाळुन याचा टिळा लावतात.तसेच रक्तचंदनाचे लाकूड रंगाने गडद लाल, कठीण असून ते चवीला तुरट असते. विशेष म्हणजे या लाकडाला सहजासहजी वाळवी लागत नाही. लाकूड सहाणेवर उगाळून त्याचा लेप सांधेदुखी, सूज व त्वचादाह कमी करण्यासाठी लावतात.तसेच संगीत वाद्य वाजवले जातात त्या वाद्यांना रक्त चंदनाच्या लाकडाचा उपयोग होतो. अनेक लोक घरात फर्निचर साठी हेचलाकूड वापरत्तात.

Vikhe patil: “भारत जोडो ऐवजी, काँग्रेस…” , विखे पाटलांचा राहुल गांधींवर घणाघात

हे झाड कुठ उगम होते…

भारतातील तामिळनाडू ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये रक्तचंदनाची झाड आहेत. सह्याद्री पर्वतरांग हि दक्षिणेपर्यंत पोहोचली आहे याच पर्वतरांगेत विस्तीर्ण जंगल सुद्धा आहेत मदुमलाई जंगल हे तीन राज्यात पसरले आहेत अश्या जंगलात ते दिसून येते.रक्त चंदनाचे हे झाड आकाराने छोटे असते.तसेच त्याची उंची हि ५ ते ८ मीटर एवढी असते त्याचे साल हे राखाडी असते.ऑस्ट्रेलिया मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात चंदन झाडाची लागवड केली जाते त्यामुळे त्याला आंतराष्टीय बाजारात मोठी मागणी आहे.

Supriya Sule: राज्याला दोन मुख्यमंत्र्यांची गरज, सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याची जोरदार चर्चा

या ठिकाणी होते चंदनाची तास्किरी ?

एका टनाचा भाव हा ५० ते ६० लाख रुपये आंतराष्ट्रीय बाजार भाव आहे .कर्नाटकात रक्तचंदनाची झाड सर्वात जास्त प्रमाणात दिसून येतात.आंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यसीमेवर जी जंगले आहेत त्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते २०१५ साली आंध्रप्रदेशात २० लोकांचा इन्काउंटर केला होता.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *