
UP Politics । २०२४ हे वर्ष निवडणुकांचं वर्ष आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण या वर्षात ३ महत्त्वाच्या निवडणुका (Election in 2024) पार पडणार आहेत. यात राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभेचा समावेश आहे. भाजपला हरवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली आहे. पण निवडणुकांपूर्वीच इंडिया आघाडीला पुन्हा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. (Latest marathi news)
Maharashtra Politics । मोठी बातमी! निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने दिला ‘या’ तीन नावांचा प्रस्ताव
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत चौधरी (Jayant Chaudhary) भाजपमध्ये जाण्याची तयारी करत असून ते अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्यासोबत सात जागा घेणार होते. पण, आता ते भाजपसोबत (BJP) पाच जागा घेण्यास तयार आहेत. रालोद आणि भाजप नेत्यांची चर्चा सुरु असून लवकरच याबाबत जयंत चौधरी निर्णय घेण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत गेले. हा इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का आहे. अशातच आता आता उत्तर प्रदेशमध्ये देखील इंडिया आघाडीला मोठा झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाले तर याचा परिणाम इंडिया आघाडीला आगामी निवडणुकांमध्ये बसण्याची शक्यता आहे.
Sambhajiraje Chhatrapati । मोठी बातमी! 5 दिवसांपासून संभाजीराजे नॉट रिचेबल