Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिराचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून आता मंदिराच्या गर्भगृहात भगवान रामललाच्या अभिषेकाची तयारी जोरात सुरू आहे. जगभरात श्रीरामाचे करोडो भक्त आहेत. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्री राम मंदिरासाठी अनेकांनी मोठ्या प्रमाणात देणगी दिली आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चेचा विषय म्हणजे पहिला देणगीदार.. आता अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्री राम मंदिरासाठी नेमकी पहिल्यांदा देणगी कुणी दिली तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया.
Pune Fire News । सर्वात मोठी बातमी! पुण्यामध्ये एकाच वेळी 10 सिलेंडरचा झाला स्फोट
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या श्री राम मंदिरासाठी पहिल्या देणगीदाराला अभिषेक कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असलेल्या सियाराम यांनी न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच श्री राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. ते आता मंदिराच्या बांधकामासाठी पहिले देणगीदार म्हणून ओळखले जातात.
माहितीनुसार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित कार्यकर्ता सियाराम गुप्ता यांनी ऑक्टोबर २०१८ मध्ये श्री राम मंदिराच्या बांधकामासाठी १ कोटी रुपये दिले होते. ही रक्कम त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काशी प्रांताला दिली.
श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी 1 कोटी रुपयांची देणगी देणार असल्याचे त्यांनी वचन दिले होते. त्यासाठी निधी उभारण्यासाठी त्यांनी आपली 16 बिघे जमीन विकली होती. मात्र, एवढंही पुरेसं नसल्यामुळे त्याने नातेवाईकांकडून १५ लाख रुपये उसने घेतले. अशाप्रकारे, त्याने 20 नोव्हेंबर 2018 रोजी 1 कोटी रुपये दान केले. यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.