राज्यात एकीकडे चिंचवड व कसबा विधानसभेच्या निकालाची चर्चा सुरु आहे, तर दुसरीकडे नागालँड मधील विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत पहिल्यांदाच रामदास आठवले ( Ramdas Aathvle) यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने ( RPI) विजयाचा गुलाल उधळला आहे.
अभिजित बिचुकले ठरले फुसका बॉम्ब! पडली अवघी चार मते
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे दोन उमेदवार नागालँडमध्ये चांगल्या मतांनी विजयी झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन महिला उमेदवारांनी महाराष्ट्राच्या बाहेर विजय मिळवला असल्याने पक्षात आनंदाचे वातावरण आहे.
नागालँडच्या विधानसभा निवडणुकीच्या ( Nagaland Assembly Elections 2023) पार्श्वभूमीवर आज मतमोजणी सुरू असून आतापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा दोन जागांवर विजय मिळवला आहे. एनडीपीपी ने एका जागेवर विजय मिळवला असून 25 जागांवर आघाडीवर आहे.
याशिवाय भाजपने दोन जागांवर विजय मिळवला असून 12 जागांवर आघाडीवर आहे. तसेच लोक जनशक्ती पार्टी ( लोक विलास) तीन जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने महाराष्ट्राबाहेर विजय मिळवल्याने रामदास आठवले यांनी आनंद व्यक्त केला आहे.
कसब्याचा निकाल ऐकून अजित पवार म्हणाले, “माझी स्थिती आता कभी खुशी कभी गम…”