योग गुरू रामदेव बाबा ( Ramdev Baba) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. सध्या सर्वत्र रामदेव बाबांच्या भव्य संन्यास दीक्षा कार्यक्रमाची चर्चा सुरू आहे. रामनवमी दिवशी होणाऱ्या या कार्यक्रमात रामदेव बाबा जवळपास 100 लोकांना संन्यासाची दीक्षा देणार आहेत.
शरद पवारांचा दाढीतला रुबाब तुम्ही पाहिलाय का; साहेबांच्या तरुणपणीचा फोटो होतोय व्हायरल
रामदेव बाबांच्या पतंजली ( Patanjali) योग पीठाद्वारे बुधवारी (दि.22) नव संवत्सर चैत्र नवरात्री निमित्त भव्य संन्यास दीक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमामध्ये रामनवमीच्या मुहूर्तावर 60 पुरुष व 40 महिला रामदेव बाबांकडून संन्यास दीक्षा घेणार आहेत.
एवढेच नाही तर रामदेव बाबांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण तब्बल 500 लोकांना ब्रम्हचर्याची शिक्षा देणार आहेत. यामध्ये महिला व पुरुष दोन्हींचा समावेश असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देखील हजेरी लावणार आहेत.
शरद पवारांचा दाढीतला रुबाब तुम्ही पाहिलाय का; साहेबांच्या तरुणपणीचा फोटो होतोय व्हायरल
भगवंताच्या रुपात या सृष्टीच्या सेवेत आपण समर्पित आहोत असे प्रत्येक संन्यासीला वाटले पाहिजे. पतंजलीमध्ये स्त्री-पुरुष, जात-धर्म असा कुठलाही भेदभाव केला जात नाही. असे योग गुरू रामदेव बाबा यावेळी म्हणाले आहेत.