
औरंगाबाद : शासनाने गायरान धारकांच्या जमीन हिसकावण्याचा प्रयत्न केला तर सरकारी कार्यालयासमोर संसार मांडू असा इशारा देत औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर २९ तारखेला जेलभरो आंदोलन करणार असल्याचे रमेश भाई खंडागळे यांनी सांगितले. शुक्रवारी जमीन हक्क बचाव परिषदेतील अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. बळवंत वाचनालयावरील विजेंद्र काबरा सभागृहामध्ये गायनधारकांच्या प्रचंड उपस्थितीत ही परिषद पार पडली. हक्काचं गायरान सोडायचं नाही असा नारा यावेळी सभागृहात सर्वत्र घुमाला होता.
बिबट्या मुलीला जंगलात घेऊन जात आहे पाहून आईने फोडला हंबरडा ; जंगली प्राण्याकडून प्राणघातक हल्ला …
गायरानधारकांना इनामी वाहिती तथा निवासी जमिनी अतिक्रमणाच्या कारणावरून निष्काशीत करण्याच्या नोटिस शासनाने बजावल्याच्या निषेधार्थ ही परिषद आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. विजय जाधव यांनी केले.
आदित्य ठाकरेंचा सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल; म्हणाले, “मागच्या दिड वर्षात…”
औरंगाबाद जिल्ह्याच्या १५० टे २०० गावातील दोन लाख गायरान धारकांनी त्यांच्या फायली सरकार दरबारी दाखल केल्या. तरीही गायरान धारकांना जमीन निष्कासित करण्याच्या नोटीस बजावण्याचे काय कारण आहे? अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातील गोरगरीब लोक गायरान जमिनी वाहिती करत आहेत. याच जमिनीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो मग जमिनीचा सातबारा वन विभागाच्या नावाने कसा? हक्काच्या वाहिती जमिनीचा सातबारा गायरान धारकांच्या नावे करण्याकरिता आपल्याला कायद्याची लढाई लढावी लागणार आहे. सत्याग्रह आणि आंदोलनाशिवाय पर्याय नाही. असे मार्गदर्शन जमीन हक्क बचाव आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर यांनी उपस्थित गायरान धारकांना केले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमवाद आणखी भडकणार? कर्नाटकच्या विधानसभेत सीमावादावर घेतला ‘हा’ निर्णय
गायरान जमिनी ताब्यात घ्या असे न्यायालयाने कुठेही सांगितलेले नसताना सरकार त्या जमिनी वनविभागाकडे कशा काय वर्ग करू शकते? असा प्रश्न यावेळी ललित बाबर यांनी उपस्थित केला. या कार्यक्रमाला दलित पॅंथर चे अध्यक्ष रमेश भाई खंडागळे , जमीन बचाव हक्क आंदोलनाचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्वनाथ अण्णा तोडकर,ॲड. शिवाजी आदमाने, सुभाष लोमटे, मधुकर कसाब, प्रभाकर दळवी, ॲड. विजय जाधव आदीची उपस्थित होती.
(प्रतिनिधी – ज्ञानेश्वर ताले)