
Ranbir Kapoor । बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी येतात. त्यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळाले. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, त्यांची मुलगी राहा हिची अजूनही चाहत्यांना एकही झलक पाहायला मिळाली नाही. (Latest Marathi News)
बॉलिवूडची लोकप्रिय जोडी सध्या विदेशात आपल्या मुलीसह वेळ घालवत आहेत. रणबीर कपूरचा विदेशातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) चांगलाच व्हायरल होत आहे. यूएस ओपन टेनिस मॅचमधील (US Open Tennis Match) हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही कोड्यात पडले आहेत तर काहींनी रणबीर कपूरला चांगलेच ट्रोल केले आहे. (Ranbir Kapoor Viral Video)
Manoj Jarange Patil । गावकऱ्यांच्या आग्रहाखातर जरांगे पाटलांनी घेतली सलाईन, आज घेणार मोठा निर्णय
या सामन्याला हॉलिवूड अभिनेत्री मॅडलिन क्लाइन हिनेदेखील हजेरी लावली होती. या व्हिडीओमध्ये कॅमेरामॅन मॅडलिन क्लाइनला कॅप्चर करत होता. त्यावेळी रणबीर कपूरही त्या फेममध्ये येण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. काहींना रणबीर कपूरचे हे वागणे अजिबात आवडले नाही. या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
पहा व्हिडिओ
एक युजर असे म्हणत आहे की, रणबीर तू इतका मोठा स्टार होऊनही टीव्हीमध्ये दिसण्यासाठी असे करत आहे. तर दुसरा युजर असे म्हणतो की, ‘रणबीर कपूर लग्न होऊनही सुधारला नाही, अजूनही तो बालिश सारखा वागत आहे.’ त्याशिवाय रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे फोटोदेखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.
Maratha Reservation | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! आरक्षण देण्यास सरकार तयार पण…