Ranbir Kapoor । कपूर कुटुंबाचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता रणबीर (Ranbir Kapoor) कपूरला कोणत्याही ओळखीची गरज नाही. स्टार किड असूनही त्याने त्याचा कधीच फायदा घेतला नाही. आपल्या अभिनय कारकिर्दीत संघर्ष करत त्याने आज असे स्थान मिळवले आहे की त्याच्या फॅन फॉलोइंगचा अंदाज बांधणे फार कठीण आहे. पण, तुम्हाला माहित आहे का ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरकडे किती संपत्ती आहे. तसेच, त्याला भव्य गोष्टींची किती आवड आहे. चला तर मग जाणून घेऊया याबदल माहिती.
Manoj Jarange Patil । भुजबळांना शांत करा, नाहीतर मराठा शांत करायला सक्षम – मनोज जरांगे पाटील
बॉलीवूडचा अष्टपैलू अभिनेता रणबीर कपूरची कौटुंबिक पार्श्वभूमी समृद्ध आहे परंतु त्याने आपल्या मेहनतीतून आणि समर्पणाने आपली संपत्ती कमावली आहे. त्याला लक्झरी लाईफची आवड आहे. तो राहत असलेल्या या घराची किंमत आणि त्याच्या महागड्या कार कलेक्शनची किंमत जाणून तुम्हालाही धक्का बसेल.
रणबीरकडे एकूण किती संपत्ती आहे?
रणबीर कपूरच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे एकूण ३४५ कोटी रुपये आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील पाली हिल्समध्ये राहणाऱ्या रणबीर कपूरच्या घराची किंमत 25 ते 30 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे अत्यंत महागड्या गाड्या देखील आहेत.
दरम्यान, सध्या अभिनेता त्याच्या आगामी ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. ट्रेलरमध्ये रणबीरचा उग्र लूक त्याच्या चाहत्यांना खूप उत्तेजित करत आहे. आता चित्रपट प्रदर्शित होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज आहे.