Na Dho Mahanor । रानकवी ना.धों. महानोर कालवश! ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rankavi Na.Dho. Great time! He breathed his last at the age of 81

Na Dho Mahanor । ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचे आज निधन (Na Dho Mahanor Death) झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. ते मागील काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यामुळे त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये (Ruby Hall Clinic) उपचार सुरू होते. या रुग्णालयात त्यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

Ajit Pawar । अजित पवार बसले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर, राजकीय वर्तुळात खळबळ

त्यांचा जन्म महाराष्ट्रातल्या वर्तमान औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावात झाला. महाविद्यालयीन शिक्षण सोडून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. मराठी साहित्यविश्वात त्यांची रानकवी म्हणून ओळख आहे. त्यांच्या कवितांमधून-गीतांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन व्हायचे. तसेच त्यांनी असंख्य लावण्याही लिहिल्या.

PM Shram Yogi Mandhan । आनंदाची बातमी! शेतकऱ्यांना सरकार देतंय महिन्याला 3 हजार रुपये, आजच करा ‘या’ योजनेत अर्ज

त्यांनी चिंब पावसानं रान झालं आबादानी, आम्ही ठाकर ठाकर, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, किती जीवाला राखायचं, जाई जुईचा गंध, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकापेक्षा एक जबरदस्त गाणी लिहिली. त्यांच्या जाण्याने साहित्य विश्वात पोकळी निर्माण झाली आहे.

Nitin Desai । नितीन देसाईंचा मृत्यू कशामुळे झाला? पोस्टमार्टम अहवालातून धक्कादायक माहिती समोर

Spread the love