Site icon e लोकहित | Marathi News

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या नवीन घराची किंमत ऐकून व्हाल थक्क

Ranveer Singh and Deepika Padukone's new house price will shock you

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण ही जोडी सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. त्यांचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असून चाहते त्यांना भरभरून प्रेम देत असतात.

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; भाजपच्या ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत

नुकतच या दोघांनी मुंबईतील (Mumbai) एका टाॅवरमध्ये अपार्टमेंट खरेदी केलं आहे. सध्या याची जोरदार चर्चा सुरु आहे. या अपार्टमेंटची किंमत जवळपास 119 कोटी रूपये आहे. म्ह्णून हे चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वात महत्वाची आणि खास गोष्ट म्हणजे दीपिका-रणवीर आता, शाहरूख खान आणि सलमान खानचे शेजारी झाले आहेत.

सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

या अपार्टमेंटचं बांधकाम पूर्ण झालं नसून याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, कामाबद्दल पाहिलं तर दीपिका आता लवकरच शाहरूख आणि जाॅन अब्राहमसोबत ‘पठाण’ या चित्रपटात दिसणार आहे. तसेच ‘रणवीर राॅकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

ऊसाचे पाचट न जाळता तयार करा सेंद्रिय खत; ‘असा’ होतो फायदा

Spread the love
Exit mobile version