मुंबई : काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2018 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या एका महिलेने छतरपूर मधील फार्म हाऊसवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप शहानवाज हुसैन (Shahnawaz Hussain) यांच्यावर केला होता. यावरून या महिलेने त्यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची याचिका दाखल केली होती. पण कनिष्ठ न्यायालयात पोलिसांनी एक अहवाल सादर करून शहानवाज हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगितले.
पण 2018 मध्ये कोर्टाने शहानवाज हुसैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले होते. पण हायकोर्टात भाजप नेत्यांनी या निर्णयाविरोधी आव्हान केले. परंतु आता दिल्ली हायकोर्टाने (Delhi highcourt) यांना मोठा धक्का दिलेला आहे. शहानवाज हुसैन यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करा आणि या प्रकरणी 3 महिन्यात तपास पूर्ण करा असे आदेश कोर्टाकडून पोलिसांना (delhi police) देण्यात आलेले आहेत.
या प्रकरणी प्राथमिक प्रक्रिया करण्यास पोलिसांची इच्छा दिसत नाहीये. पोलिसांकडून कनिष्ठ न्यायालयात सादर केलेल्या अहवालात अंतिम अहवाल नव्हता. पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी अंतिम रिपोर्ट देण्याची गरज आहे. तसेच या प्रकरणी एफआयआर दाखल झाला पाहिजे व कलम 173 सीआरपीसी अंतर्गत अंतिम रिपोर्ट दाखल झाला पाहिजे, असे आदेश कोर्टाकडून देण्यात आले असल्याचे न्यायमूर्ती आशा मेनन यांनी निकालात सांगितलेले आहे.
दरम्यान, शहानवाज हुसैन हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात मंत्री होते तसेच ते सध्या बिहार विधान परिषदेचे आमदार आहेत. याआधी ते तीन वेळा खासदार देखील होते.