Site icon e लोकहित | Marathi News

Satara: साताऱ्यात जादूटोणा करत तरुणीवर बलात्कार , आरोपीला अटक

Rape of young woman while performing witchcraft in Satara, accused arrested

सातारा : साताऱ्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. साताऱ्यात एका तरुणीवर बलात्कार (Rape case)करण्यात आला आहे .दरम्यान बलात्काराआधी या तरुणीच्या डोक्यावरुन लिंबू फिरवून जादूटोणा केला. पीडित तरुणीने साताऱ्यातील (Satara)शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत पीडित तरुणीने धक्कादायक आरोप केले आहेत.

दरम्यान पोलिसांनी (Satara Police) एकावर गुन्हा नोंदवून घेतला असून पुढील तपास केला जातो आहे.आरोपी असलेल्या मुक्तार नासीर शेख या नराधमास अटकही करण्यात आली असून पोलिसांकडून त्याची कसून चौकशी केली जातेय. या घटनेनंतर मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा आता पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

घटना काय घडली?

साताऱ्यातल्या एका कॉलनीत मुक्तार नासीर शेख या तरुणाने एका तरुणीला एकटीला रुममध्ये नेले. त्यानंतर तिच्या डोक्यावरुन लिंबू फिरवून तिला भुरळ पडली आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण साताऱ्यात खळबळ माजली आहे.पीडितेने केलेल्या आरोपांनंतर मुक्तान शेख याला पोलिसांनी ताब्यातही घेतलं आहे.

375 आणि 201(3) प्रमाणे संशयित आरोपी असलेल्या मुक्तार नासीर शेख याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.याआधीही नासीर शेख यांनी अशाचप्रकारे इतरही तरुणींसोबत गैरकृत्य केलेलं असण्याचीही भीती व्यक्त केली जाते आहे. त्याच पार्श्भूमीवर पोलिसांकडून पुढील तपास करत आहेत.

Spread the love
Exit mobile version