मुंबई : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) आणि अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. त्या दोघांनी चित्रपटांमध्ये अनेकवेळा एकत्र काम केले आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून रश्मिका आणि विजय यांच्या डेटिंगच्या चर्चा कायम सुरू असतात. त्यांनी याबाबत कधीही खुलासा केलेला नाही, मात्र आता रश्मिकाला ती विजयला डेट करतेय का? असा प्रश्न विचारण्यात आला आणि त्यावर तिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीमध्ये दोघांच्या डेटिंग बद्दल विचारलं असत, रश्मिका म्हणाली, “या सर्व अफवा क्युट आहेत. आम्ही चित्रपटांमध्ये सोबत काम केले आहे म्हणून आम्ही जावळ आलो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. माझी गँग हैदराबादमध्ये आहे आणि त्याचीदेखील गँग हैदराबादमध्ये आहे आणि आमचे बरेच कॉमन फ्रेंड्स आहेत. ज्यावेळी सर्व जग ‘रश्मिका आणि विजय’ सारखे असते तेव्हा ते खूप क्यूट वाटतं.”
Kangana Ranaut: अभिनेत्री कंगणा रणावतची राजकारणात एन्ट्री? शनिवारी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट
त्यानंतर रश्मीकला विजयबरोबर पुन्हा एकदा काम करण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावरली ती म्हणाली, “ लवकरच मला त्याच्याबरोबरकाम करायचंय.आम्ही लवकरच नवनवीन चित्रपट केले पाहिजेत खूप मज्जा येईल, आम्ही चांगले कलाकार आहोत, आम्ही दिग्दर्शकांना निराश करणार नाही,” असं देखील ती म्हणाली आहे.
Rain Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज; ‘या’ भागात ‘यलो अलर्ट’