
Rashmika Mandanna । अभिनेत्री रश्मिका मंदाना सोशल मीडियावर कायम वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. मागच्या काही दिवसापूर्वी रश्मिकाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे रश्मिका चांगलीच चर्चेत आली होती. रश्मिकाचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. सध्या देखील नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटामुळे अभिनेत्री रश्मिका मंदाना तुफान चर्चेत आली आहे. (Entertainment News)
Sharad Mohol । ब्रेकिंग! शरद मोहोळ हत्या प्रकरणानंतर आमदार धंगेकर यांचा गंभीर आरोप!
‘ॲनिमल’ चित्रपटातील (Animal Movie) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्यासोबत रश्मिका हिची केमिस्ट्री देखील चाहत्यांना प्रचंड आवडली आहे. सध्या देखील रश्मीका चर्चेत आली आहे. मात्र यावेळी रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. सध्या सगळीकडे रश्मीका मंदाना हीच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. वयाच्या 27 व्या वर्षी रश्मीका मंदाना 34 वर्षीय अभिनेत्यासोबत विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगल्या आहेत.
Viral video । संतापलेल्या म्हताऱ्याने थेट तरुणाला घातली गोळी, पाहा थरकाप उडवणारा व्हिडीओ
रश्मिका मंदाना सोबत विजय देवरकोंडा याचे नाव जोडले जात आहे. मागच्या अनेक महिन्यापासून विजय आणि रश्मिका यांच्या अफेअर्सच्या चर्चा रंगल्या आहेत. एवढेच नाही तर ॲनिमल सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान रणबीर याने रश्मिका-विजय यांच्या नात्याबद्दल काही खास गोष्टी देखील सांगितल्या होत्या.
सध्या रश्मिकाचा एकफोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमुळे अभिनेत्रीच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. एका युजरने एक्स वर रश्मिकाचा फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तू आमच्यासाठी नॅशनल क्रश आहेस… तुझ्यासारखी पत्नी मला देखील भेटेल.. अशी अपेक्षा आहे”
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेटकऱ्याच्या या ट्विटवर अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने प्रतिक्रिया दिली आहे. प्रतिक्रिया देत ती म्हणाली, “ज्यावेळी मी लग्न करेल त्यावेळी मला आशा आहे की माझा पती देखील माझ्याबद्दल एक अद्भुत पत्नी म्हणून विचार करेल. सध्या सगळीकडे रश्मिका हिच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
रश्मिका प्रत्येक सणासाठी विजय देवरकोंडाच्या घरी जाते. या दोघांच्या साखरपुड्याची देखील सगळीकडे चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या दोघांचा साखरपुडा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यावर रश्मीका आणि देवरकोंडा या दोघांनीही किंवा त्यांच्या कुटुंबियांनीही कोणतं वक्तव्य केलेले नाही.